इथे अजूनही भय संपत नाही....
अठरा विश्व दारिद्र्यात भरकटलेला व पिचलेला हा आदिवासी पारधी समाज आजही शिक्षण व कायद्याला मान्य करताना दिसत नाही.
PASCO कायद्यातील कलम ३४ असं सांगतो की ० ते १८ वयोगटातील मुलांना मानसिक भावनिक सरंक्षण देणे. परंतु या कायद्याच कसलेही गांभीर्य आदिवासी पारधी समाजास नाही.कारण हा समाज असतानाच गुन्हेगारी समजला जातो. मग कायदा काय अन् शिक्षण काय सारं काही पायदळी तुडवल जात.
याचं उदाहरण म्हणजे यशोधरा प्रकल्पाला ५ वर्षे होऊन गेली आहेत. ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आजवर या आदिवासी पारधी समाजातील मुले व मुलींना शिक्षण देण्याचं काम केले जाते. हा प्रकल्प आजवरच्या खूप साऱ्या चढ उतारावरून सर्वकाळ वाहत गेला आणि आजही जात आहे. मग ते मुलांच्या दोन वेळच्या भुकेकरिता असो किंवा पालकांच्या बंधनातून मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी स्वजबाबदरीवर आणणे असो हा संघर्ष दर वर्ष करावा लागतो.
मुलाच्या बाबतीत हा संघर्ष जरा कमी करावा लागतो पण मुलींच्या बाबतीत हा संघर्ष टोकाला जातो.
या प्रकल्पात मुली ५ वर्षे झाली राहतात पण १२ ते १३ व्या वर्षी मुलींच्या शरीरात काही मानसिक व शारीरिक बदल होतात व मासिक पाळी ही त्यांच्या शरीरात होणारी मोठी बदलाची प्रक्रिया आहे. ह्या बद्दलची माहिती पालकांना कशी सांगावी हा जसा प्रश्न त्या मुलींना पडतो ? अन् पालकांना समजले तर तसाच एक प्रश्न त्या पालकांच्या मनात डोकावतो की मुलींना आता ह्या परिस्थितीत बाहेर ठेवावे का ? अन ठेवलीच तर बरेच प्रश्न माना वर काढतात. त्यापेक्षा तिच्या नकळतपणे तिचे शिक्षण बंद करून तिच्या लग्नाची तयारी केली जाते. हसण्या खेळण्याच्या व त्याच्या सोबत शिक्षण घेण्याच्या वयात संसाराचे मोठे ओझे ह्या कोवळ्या खांद्यावर लादले जाते. नाहीतर ह्याच कोवळ्या कळया कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक भांडवल म्हणून विकल्या जातात. मग ती लादलेल्या संसाराचं ओझं व जर विकलं असेल तर पदोपदी येणाऱ्या समस्याना झेलू शकत नाही.
अशा ह्या कोवळ्या कळया वाचवण्यासाठी यशोधरा हा प्रकल्प सदैव तत्पर असतो. पण केवळ सरंक्षण करून चालत नाही तर त्यांच्या *सक्षमीकरणाच्या उद्देशाने काम करावे लागते. तरच त्या कळ्या उमलू शकतील व ह्या सावित्री च्या लेकी स्वतःचा निर्णय स्वतःच्या हातात ठेवू शकतील.
म्हणून त्यांच्या निर्णयाच्या ह्या हक्कासाठी, तुमच्या मदतीच्या हातांची गरज आहे व ही मदत नक्की होईल ही अपेक्षा करतो....
मदत कशासाठी हवी आहे
१) शिक्षणा बरोबरच मन रमावे याकरिता संगीतमय वातावरण निर्मिती करणे म्हणून कला संगीत साहित्यासाठी.
२) स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कला कौशल्य आवड यावर आधारित असलेले शिक्षण देणे.यासाठी शिलाई मशीन.
३) क्रीडा साहित्य - खेळामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी.
४) डिजिटल क्लास रूम,प्रोजेक्ट इ-लर्निंग.
५) आणि हे सारं करताना दोन वेळचं पोटभर जेवण मिळण्यासाठी.
आपली मदत मिळाली तर नक्कीच ह्या कळया वाचू शकतील....
धन्यवाद
ईश्वर काळे.
आपण मदत कशी कराल
चेक धनादेश स्वरूपात,धान्य किराणा स्वरूपात, वस्तू साहित्य स्वरूपात, शैक्षणिक साहित्य स्वरूपात, या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारची मदत स्वीकारली जाईल....
संस्थेच्या मदतीसाठी बँकेची माहिती.
बँकेचे नाव - युनियन बँक ऑफ इंडिया.
शाखा - राशीन.
IFSC - UBIN0536423 ( N नंतर शुन्य आहे.)
खाते नंबर - 364202010121783
खाते नाव - आदिवासी युगप्रवर्तक सामाजिक प्रतिष्ठान बारडगाव दगडी, ता - कर्जत, जि - अहमदनगर.
अधिक माहिती साठी संपर्क
श्री . ईश्वर. दे. काळे.
8149091844.
heyishawar@gmail.com

No comments:
Post a Comment