Monday, June 17, 2019

पास झालो मी अन मला नविन दप्तर हवयं.....

*पास झालो मी अन मला नविन दप्तर हवयं.....*

असं आपल्या घरामधील प्रत्येक लहानग्या चिमुकले आसतील किंवा मोठे लेकर्याच्या तोंडुन हे वाक्य सहज ऐकायला मिळत असते आणि तो हट्ट सहाजिकच कुटुंबाकडुन पुरवला जातो.परंतु ईथे जरा वेगळ म्हटलं तर वावंग ठरणार नाही कारण या वंचिताचे पालकामध्ये शिक्षण बद्दल चा  असणारा अभाव,खर्च करण्याची दानत आसतानाही परउपकारावरती अवलंबुन असणारा हा वंचित घटक एरवी स्वत:ची हौस मौज मजा नशाबाजी करण्यासाठी जपुनक करून शैक्षणिक खर्च व्यर्थ ठरविणारा अशी ह्या आमचा पालक वर्गाची ओळख.
आहे त्या मळकट फाटके तुटके एका अंगावरच्या एका कपड्यावरती अँडमिशन करून घ्यावं लागत आसेल तर शालेय साहित्य दप्तर चा तर विषय लांबच......
पण या वंचिता मधली एक गोष्ट मात्र आशी माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांच्या मधला माझ्या बद्दल चा अात्मविश्वास ते चिमुकले प्रकल्प प्रवेशित झल्यावरती ते सहज असे म्हणतात की- विश्वास आहे आम्हींचा तुमच्यावर कधी उपाशी पोटी ठेवलं नाही व पुढेही ठेवु शकत नाही. मग ती पोटाची भुक असो की शिक्षणाची.....!
हे ऐकुन गर्वाने नक्कीच 56 इंच छाती फुगते तेही सत्यच यात काही शंकाच नाही.वंचित चिमुकल्यांचा माझ्यावरचा अात्मविश्वास यामधुन वाटणारं समाधान इथपर्यंत ठिक आहे परंतु त्यंच्या गरजा व जबाबदारीचं ओझं वाढलेलं असल्या कारणी जबाबदारीचं ओझ्याला हातभार लावण्यास अनेकापुढे हात केला जातो. यातुनही काही मदतवीर प्रकल्पाला नेहमी प्रमाणे मदतीचा हातभार लावित आसतात त्यांच्यामुळे हा प्रकल्प खंबीरपणे गेली 7 वर्षा पासुन तग धरून उभा आहे. गत वर्षीया मध्ये प्रकल्पाचे नाव लौंकिक झाल्याने वंचिता चिमुकल्यांची संख्यानिसी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.हि एक या *"यशोधरा"* प्रकल्पाचे यशच आहे परंतु त्याच बरोबर प्रकल्पावर आर्थिक भार पण पडणार आहे.म्हणुन मी विनंतीपुर्वक अहवान करतो की नविन शालेय वर्षा मध्ये वंचिताच्या शिक्षणासाठी टिचभर पोटाच्या भुकेसाठी नेहमी प्रमाणे मदतीचा हात भार लावाल या आपेक्षेने आपल्या मदतीत च्या प्रतिक्षेत......🙏🏻
धन्यवाद  ......🙏🏻

कळावे.

                 *ईश्वर काळे*
             *मो:8189091844*

No comments:

Post a Comment