मातीचा प्रकार
आणि दर्जा यानुसार पिकांची वाढ कशी होणार हे ठरत असते. त्यामुळे अन्य कोणत्याही
क्षेत्राच्या तुलनेमध्ये मातीच्या दर्जाविषयी शेतीमध्ये अधिक महत्व दिले जाते.
फ्रँकलिन रूझवेल्ट (१९३६) यांच्या मते, मानवी
संस्कृतीची वाढ ही सुपीक जमिनीच्या परिसरातच झाली. उलट अनेक बलाढ्य मानल्या
जाणाऱ्या संस्कृतींचा र्हास हा खराब जमिनीमुळे झाला. कारण, संजीवांच्या
जगण्यासाठी आवश्यक अन्नाची उपलब्धता करण्याचे महत्त्वाचे माध्यम माती हेच आहे.
सुपीक माती हाच संस्कृतीचा आधार |
मातीच्या वरील
काही इंचाच्या भागांमध्ये विविध सूक्ष्मजीव राहतात त्यांच्यामुळे या मातीला मातीचे
फूल किंवा जीवंत माती असे म्हणतात. यातील असंख्य सूक्ष्मजीव सातत्याने कार्यरत
राहून मातीतील विविध घटकांवर प्रक्रिया करत असतात. प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ
कुजवणे, कुजल्यानंतर
त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करणे यासाठी सहजीवी आणि स्वतंत्रपणे काम
करतात. यांच्या खाद्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ किंवा पिकांचे अवशेष
सातत्याने उपलब्ध करणे आवश्यक असते. जमिनीचे जीवशास्त्रीय वैशिष्टे जपणे ही काळाची
गरज ठरणार आहे.
मातीचे फूल जपणे |
मातीची सुपीकता
कमी होण्यामध्ये तापमानाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. कोरड्या आणि अधिक तापमान
असलेल्या विभागातील माती खराब होण्याचा वेग अधिक असतो. गेल्या काही वर्षांमध्ये
जागतिक पातळीवर ३०% इतके पिकाखालील क्षेत्र ही नापीक होण्याच्या दिशेने वेगाने जात
आहेत. गेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मातीचा ऱ्हास होण्याचे
प्रमाण वेगाने वाढले आहे. माती खराब होण्यामध्ये सलग एकाच प्रकारची पीके घेणे, सेंद्रिय
खतांऐवजी रासायनिक खतांचा वापर वाढणे या मानवनिर्मित कारणांसोबतच पुर आणि
दुष्काळाचाही मोठा वाटा आहे.
माती ऱ्हासामागे मानव, निसर्गनिर्मित कारणे |
मातीचा २ सेमी
जाडीचा थर तयार होण्यासाठी सुमारे ५०० वर्षे लागतात. मातीतील वरच्या थरातील
सूक्ष्मजीवांसाठी सेंद्रिय घटकांची उपलब्धता नियमितपणे टप्याटप्याने करत राहायला
हवी. शेतातील काडीकचरा, पिकांचे
अवशेष जाळण्याऐवजी कुजवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. शेळ्या-मेंढया किंवा गाई-म्हशी
शेतीमध्ये कळपाणे फिरवल्यास अनावश्यक गवताचे प्रमाण कमी होण्यासोबतच त्यांच्या
लेंडी-शेण-मूत्र यातून सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. बीजप्रक्रिया व जिवाणू संवर्धनाच्या
वापरामुळे शेतीत उपयुक्त जीवाणूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचे
उदाहरण म्हणजे सेलेम(इजिप्त) या वाळवंटसदृश भागाचे लागवडीयोग्य जमिनीत रूपांतर
करण्यात यश आले आहे.
मातीच्या सेंद्रिय घटकांच्या वाढीसाठी |
अन्न द्रव्य
योग्य प्रमाणात उपलब्ध राहण्यासाठी तसेच पिकांच्या चांगल्या वाढीसाठी जमीन नेहमी
वाफसा अवस्थेत असावी. पिकांना योग्य प्रमाणात संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे.
तुषार सिंचनाने पाणी देताना जमिनीची जलधारणशक्ति, पाणी झिरपण्याचा वेग, उपलब्ध पाणी
आणि पीक वाढीच्या अवस्था विचारात घ्याव्यात.
पिकांना पाणी देताना...? |
No comments:
Post a Comment