Monday, January 6, 2020

सकाळ' मुळे शिकतोय आम्ही वंचित

सकाळ' मुळे शिकतोय आम्ही वंचित
                      यशोधरा निवासी प्रकल्प
दि.18 मे 2017 रोजी पूणे येथे पत्रकार परिषद घेतली  होती यामध्ये बरेच पत्रकार मंडळी उपस्थित होते. यशोधरा निवासी प्रकल्प हा ना कुठल्या ही शासकीय मदती शिवाय लोकसहभागातून चालविला जात आहे. व या प्रकल्पामध्ये रुढी परंपरेने ग्रासलेला गुन्हेगारी म्हणून ओळखला जाणारा आदिवासी पारधी समाजह्यांची मुले येथे या प्रकल्पात निवासी शिक्षण घेत आहेत. व शासन या बाबतीत जेंव्हा केंव्हा निर्णय घेईल परंतु तो पर्यंत हा प्रकल्प जिवंत राहिला पाहीजेत. अशी व्यथा पत्रकार मंडळी समोर त्यावेळी मांडण्यात आली होती. या मधून खासकरून जातीने दखल सकाळ या वृत्तपत्राने घेतली होती. तसेच याच प्रमाणे स्थानिक सकाळ चे पत्रकार प्रतिनिधी च्या माध्यमातून यशोधरा प्रकल्पाला ओळखू लागले. याचेच असे काही उदाहरणे म्हणजे रोटरी क्लब सिंहगड रोड पूणे,रोटरी क्लब भिगवण या सारखे आधार स्तंभ फाँडेशन पुणे,अग्निपंख फाँडेशन श्रीगोंदा यांच्या सारखे अनेक दात्रुत्वाकडून किराणा,दररोज दुध,शैक्षणिक साहित्य. अंथरूण पांघरून, कपडे असे अनेक मदतीचा हातभार या प्रकल्पाला लागत आहे. याच लाभातून आज रोजी 70 मुले-मुली निवासी शिक्षण घेत आहेत. तसेच भविष्यात ही शासन या प्रकल्पाचा जेंव्हा केंव्हा विचार करेल,परंतु तोपर्यंत या सर्व दात्रुत्वाचा आशिर्वाद नेहमीच राहिल ही अपेक्षा. 
या सर्व बाबीतुन यशोधरा निवासी प्रकल्पाला मिळालेले यश:-
(1) प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षणाची जाणीव जागृती या कार्यक्रमाद्वारे कर्जत तालुक्यातील एकूण 700 विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत.
(2) यशोधरा निवासी प्रकल्पातील आवक जावक मुलांची संख्या 250 मुले-मुली आत्ता पर्यंत.
 इयत्ता 10वी चे शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या 20 आहे.
 इयत्ता 12वी त शिक्षण घेणारी संख्या 5 पर्यंत आहे. पदवी पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या 2आहे. 
           
      यशोधरा निवासी प्रकल्प 
            बारडगाव दगडी 
            तालुका-कर्जत
            जि-अहमदनगर 
             414403
ईश्वर दे. काळे
मो. नं .8149091844

No comments:

Post a Comment