Sunday, July 21, 2019

बास झाली आता शाळा....!

*बास झाली आता शाळा....!
*

        *सलोनी*

आई करीता मी गुलामी पत्कारते, पाहवत नाही आईचं दुख: म्हणुन मी जाते आई बरोबर आता परत नाही येनार शाळेत.....!
*यशोधरा* प्रकल्पातील गोड निरागस सोजवळ विद्यार्थीनी सलोनी नावही तिला शोभेल असं  ती गेल्या वर्षी इ 6वी ची परिक्षा संपवुन सुट्टीवर घरी जाता वेळी चे हे तिचे अखेरचे शब्द:.....
या प्रकल्पातील प्रत्येक मुलांच्या पालकांना कौटुंबिक जिवन जगण्याकरीता संघर्ष चालु आसतो मग तो गुन्हेगारी किंवा व्यस्नधिन्त असो, या सारख्या वागण्यामुळे नाहाक बळी जातायेत यांचीच हिच लेकरे अशाच कारणातुन सलोनी ही त्यातली शिकार झाली ती पुर्ण अडकली आहे.
तिने आई वडीलांकरीता स्वत: ला विकुन घेतलंया आज ती परख्या ठिकाणी बंधी म्हणुन जिवन जगत आहे. कारण बापाला मोका च्या केस मधुन सोडवायचं आहे, व ज्यींच्याजवळ बंधी म्हणुन आहे त्यांचे कर्ज फेडण्यासाठी व स्वत:ला मुक्त होण्यासाठी अखेर तीने तमाशात जायचे ठरवलं आहे.
वयाच्या 13 व्या वर्षी कुटूंबाची जाबाबदारी घेत जणु तिने शर्यतीचा विढा उचलुन संकटाला सामोर जाणार हे शेवटचं निश्चित तिने केलं. एका द्रुष्टीने या वयात घेतलेला निर्णय कौतुकास्पद पण का करावं ? कारण तीला आजुन बाहेरचं जगाचा अनुभव नाही आणि जेव्हा अनुभव येईल त्या वेळी वेळ निघुन गेलेली असेल.
शेवटी माझ्या मनामध्ये सलोनी ची व्यथा सतत रूतत होती,तिला वाचविण्यासाठी चा एक छोटासा प्रयत्न करीत आहे.अजुनही वेळ गेलेली नाही ती प्रकल्पामध्ये शिक्षणासाठी परत येवु शकते ते तुमच्या आमच्या मदतीशिवाय, आशी वेळ येवु नाही पण आली आहे.तिला वाचविण्याकरीता यशोधरा प्रकल्पातील चिमुकल्याच्या सर्व पालकांच्या सहभागातुन 5000 हाजार ची मदत जमा केली आहे ती लवकरच तिच्या आई च्या खाते जमा करणार आहोत.परंतु रक्कम फार मोठी असल्याने आम्ही ते पेलु शकत नाही. म्हणुन
विनंतीपुर्वक आपल्या सर्वांपुढे आहावान करतो की तिला बंदीतुन मुक्त करण्यासाठी आपल्या मदतीचा हात हवा आहे हि आपेक्षा..🙏🏻
   कळावे

यशोधरा प्रकल्प
मो : 8149091844

( टिप: सदर आपण मदत करत आसाल तर त्या कुटूंबासी संर्पक करवुन दिला जाईल )